Jammu and Kashmir – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shaha) यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या विविध सभा आगामी काळात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) होणार आहेत.
त्यामुळे सभांचा धडाका लावून भाजप जम्मू-काश्मीरमधील वातावरण ढवळून काढण्यास सज्ज झाल्याचे सूचित होत आहे. निवडणुकीची चाहूल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून विधानसभा निवडणूक प्रलंबित आहे. ती लवकरात लवकर घेण्याची मागणी भाजपेतर पक्षांकडून केली जात आहे. मात्र, ती केव्हा होणार याचा थांगपत्ता अद्याप तरी लागलेला नाही.
अशात भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी दिलेल्या माहितीमुळे कुतूहल चाळवले गेले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतले. त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जाणार आहे.
त्यासाठी भाजप 24 ऑक्टोबरपासून जगजागृती अभियान हाती घेणार आहे. त्या अभियानांतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सभा होतील.
त्यासाठी मोदी, शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आदी केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरला भेट देतील, असे रैना यांनी नमूद केले.