मुंबई – बॉलीवूड ड्रेस डिझाइनर फॅशन डिझायनर सब्यसंची मुखर्जी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने नुकतंच लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच केले होते.
मात्र, मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने जाहिरात केली होती. ती पद्धत अनेकांना खटकली असून, सब्यसंची मुखर्जी याला कायदेशीर नोटीस बजविण्यात आली होती. अनेकांनी त्याच्या या मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल टीका सुद्धा केल्या.
शेअर केलेल्या फोटोत मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेलचा वापर करण्यात आला होता. त्यावरून सोशल मीडिया युजर्स आणि वकील आशुतोष दुबे यांनी सब्यसंची मुखर्जी याला नोटीस बजावली.
तसेच, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसंची मुखर्जी याला ही जाहिरात काढून टाकण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देऊन, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता.
त्यानंतर तातडीने सब्यसंची मुखर्जीने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागितली मागत जाहिरातीसाठी पवारण्यात आलेल्या अर्ध-नग्न मॉडेलचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविला आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे.