चेन्नई – साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड म्हणजेच, अभिनेते रजनीकांत यांना शुक्रवारी (दि. 29) चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होत. रजनीकांत यांना चक्कर आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.
रजनीकांत यांच्यावर ‘कॅरोटिड आर्टरी’ ही शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे.
ही शस्त्रक्रिया पार पडली तेव्हा पासून रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत त्यांचे चाहते खूप चिंतेत होते. मात्र आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Returned home 🙏 https://t.co/35VeiRDj7b
— Rajinikanth (@rajinikanth) October 31, 2021
रजनीकांत यांना काल अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विट मध्ये रजनीकांत यांनी “घरी परतलो..’ असं म्हंटलं आहे.
यात त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी ‘लवकर बरे व्हा..! अशा कमेंट्ही केल्या आहेत.