मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही त्यामुळे आर्यन साठी हा मोठा दिलासा आहे. सहा हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. असे एनसीबीकडून आज शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मुंबईत झालेल्या कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी आर्यनला निमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते असे एनसीबीने म्हटले आहे. कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण 14 जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला आहे. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली. एसआयटीला कोर्टाने मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही.
एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली कॉर्डिलाय क्रुझवर धाड टाकण्यात आली होती. यावेळी कॉर्डिलाया क्रुझवर ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणात आर्यन खानला जाणुनबुजून गोवण्यात आल्याची माहिती नंतर समोर आली होती.