Aryan Khan Drugs Case : ….तर यंदा आर्यन खणाची दिवाळी तुरुंगातच

मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला कोणताही दिलासा मिळाला नसून त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानसह अन्य सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज आर्यनसह इतर आरोपींना सर्व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयापुढे हजर केले होते. या सुनावणीवेळी न्यायालयाने आर्यनची कोठडी 30 ऑक्‍टोबरपर्यंत वाढवली आहे.
त्यामुळे

आर्यनचा आणखी दहा दिवस मुक्‍काम तुरुंगातच राहणार आहे. आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये आहे. मुंबई ड्रग्जप्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिले गेले. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.

आर्यनच्या वकिलांकडे 30 ऑक्‍टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर न्यायालयाला 12 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या 7 दिवसांत दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद होऊन न्यायालयाने आपला निर्णय न दिल्यास आर्यन खानला दिवाळी कारागृहातच काढावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.