मुंबई – बिग बॉस 11 मध्ये आपल्या स्टाईलने आणि ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अर्शी खान आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अर्शी खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. आता अर्शी खान तिच्या बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी तयार आहे. स्वतः अर्शी खानने याला दुजोरा दिला आहे. मात्र, तिने अद्याप तिच्या बॉयफ्रेंडबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातम्यांनुसार, अर्शी खान वर्षभरानंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. ती म्हणाली, ‘तो टीव्ही इंडस्ट्रीचा भाग नाही. तो एक व्यापारी आहे. ती म्हणाली की, बिग बॉसनंतर मी माझे वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’
अनेकवेळा अर्शी खान आणि इशान मसिहच्या बातम्या मीडियामध्ये येत असतात. अर्शी अनेकदा इशानसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. मात्र, जेव्हा अर्शी खानला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत. लोकांना वाटते की तो माझा प्रियकर आहे. आम्ही दोघे एकत्र काम करतो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.’
अर्शी खानला बिग बॉसमधून विशेष ओळख मिळाली आहे. बिग बॉसच्या घरात अर्शी खानच्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय अर्शी बिग बॉस 14 मध्येही दिसली आहे. अर्शी खान ‘इश्क में मरजावां’, ‘विश’ आणि ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम करत आहे. दुसरीकडे अर्शी खान देखील 2015 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती.