पिंपरी – डेटिंग संकेतस्थळावर तरुणीचा मोबाइल क्रमांक कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. त्यामुळे संबंधित तरुणीला वेगवेगळ्या मोबाइलवरून सतत फोन व मेसेज आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय 22, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि. 31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीचा मोबाइल क्रमांक आरोपी पानसरे याने एका डेटिंग वेबसाईटवर कॉल गर्ल म्हणून अपलोड केला. याबाबत पिडीत तरुणीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे लेखी तक्रार केली. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.