नारायणगाव -भावाचा खून करून फरार झालेला आरोपी 24 तासांत पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलीस यांनी संयुक्तिक कारवाई करून अटक केली आहे. चुलत भावाचा मंगळवारी (दि. 9) खून करून फरारी झालेला आरोपी अमोल बाळकृष्ण भुजबळ हा दुचाकीवरून खेडवरून मंचरच्या दिशेने येत आहे.
अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षचे सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते पथकासह गस्त घालित असताना मिळताच त्यांनी सहायक उपनिरीक्षक राजू पवार, नारायणगाव पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन आरोपीस बुधवारी (दि. 10) दुचाकीसह ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर अधीक्षक विवेक पाटील पुणे, उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक उपनिरीक्षक राजू पवार, किरण कुसाळकर, भीमा लोंढे, शैलेश वाघमारे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ पथकाने केली.