बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

2013 ते 2018 या काळात मारामारी, दरोडा, विनयभंगाचे 5 गुन्हे

वडगाव मावळ -पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांनी विनापरवाना बेकायदा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी दुचाकीसह रंगेहात शुक्रवारी (दि. 5) पहाटे सव्वादोनच्या सुमारास अटक केली. अटक आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 8) पोलीस कोठडी दिली. पोलीस नाईक महादेव बलभीम म्हेत्रे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. मंगेश भीमराव मोरे (वय 24, रा. माळीनगर, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार मंगेश मोरे हा विनापरवाना गावठी कट्‌टा, एक जिवंत काडतुसे बाळगत असून, गुन्हेगार मोरे हा दुचाकीवरून वडगाव हद्दीतील फेडेक्‍स कंपनीजवळ सेवा रस्ता येथे येणार असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, कर्मचारी महादेव म्हेत्रे, चंद्रकांत सोनवणे, दीपक गायकवाड आदी पथकाने सापळा रचून घटनास्थळी पोहचले. त्यावेळी गुन्हेगार मोरे दुचाकीवरून त्या ठिकाणी येताच त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ बेकायदा गावठी कट्‌टा, एक जिवंत काडतुसजवळ बाळगल्याचे रंगेहात सापडला. त्याने त्याला पंचासमक्ष मुद्देमालासह अटक करण्यात आली. मंगेश मोरे याच्यावर आर्म ऍक्‍टअंतर्गत 3(25) गुन्हा दाखल करण्यात आला.

मोरे हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये “रेकॉर्ड’वरील गुन्हेगार असून, त्यांचेवर 2013 ते 2018 या काळात मारामारी, दरोडा, विनयभंग असे 5 गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. आरोपी मंगेश मोरे याला पोलिसांनी अटक करून शुक्रवारी (दि. 5) न्यायालयात हजर केले असता आरोपी मोरे याला सोमवारपर्यंत (दि. 8) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.