Deepika Padukone – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ (Singham) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ (Singham Again) असे आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आहेत.
त्यांच्या ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, सिम्बा’ या सारखे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता लवकरच त्यांचा बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) खतरनाक लूक आऊट झाला आहे.
View this post on Instagram
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमातील दीपिका पदुकोणचा लूक आऊट करण्यात आला आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका (Deepika Padukone) खूपच खतरनाक दिसत आहे. रोहित शेट्टीने अभिनेत्रीचे वेगवेगळ्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा लूक शेअर करत रोहित शेट्टीने लिहिलं आहे, “नारी सीता का भी रूप है और दुर्गा का भी…यए हमारी शक्ती शेट्टी…मेरी लेडी सिंघम..दीपिका पदुकोण”. रोहित शेट्टीने शक्ती शेट्टीला सर्वात क्रूर ऑफिसर म्हणटले आहे.
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली असून, फॅन्सला देखील तिचा अंदाज आवडला आहे. नेटकरी दीपिकाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.