पुणे : लष्कराला अभियांत्रिकी सेवा पुरविणाऱ्या बॉम्बे सॅपर्स या संस्थेच्या स्थापनेला 200 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या द्विशतकपूर्ती कार्यक्रमांचा समारोप आज लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांना एका पत्रकाराने मराठीतून प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर मराठीतूनच दिले.
मूळचे पुण्याचे असलेले मुकुंद नरवणे यांची गतवर्षीं ३१ डिसेंबर रोजी भारताच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.