जैशच्या दहशतवाद्यांकडे एम 4 कार्बाइन, मोठा कट उधळला

श्रीनगर : जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेच्या तीन अतिरेक्‍यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून संहारक अशा एमके4 कार्बाइनसह मोटा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा शस्त्रसाठा अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वापरल्या जात असलेल्या बुलेटप्रुफ मोटारीतून नेला जात होता. त्यामुळे पाकिस्तानी घुसखोरांचा आणखी एक मोठा हल्ला घडवचण्याचा कट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून एके 47 रायफली, बॉम्ब, हातबॉम्ब, पिसतूल, सॅटेलाईट फोन, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम अीाण जीपीएस जप्त करण्यात आले आहे.

या चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्‍यांनी चकमकीपुर्वी कोणत्या वाहनातून प्रवास केला असावा याच्या तपासात दहशतवादाशी संबंधित घटनांचा तपास करणाऱ्या एनआयए सहभागी होण्याची शक्‍यता आहे. जम्मू काश्‍मिरातील 30 वर्षांच्या दहशतवादाच्या दीर्घ प्रवासात एम 4 कार्बाइन सापण्याची ही दुसरी घटना आहे. यापुर्वी ही 2018मध्ये सापडली होती. त्यावेळी चकमकीत अनेक जवान शहीद झाले होते. एम4 ही एअर कुल, गॅस ऑपरेटेड आणि मॅगेझिन फेड कार्बाइन आहे. तिचा वापर अमेरिकन सैन्याकडून युध्दात मोठ्या प्रमाणावर केला जातो. या गनमधून हातबॉम्ब एक किमी पर्यंत लांब फेकता येऊ शकतो. उडत्या विमानांचा वेध घेता येऊ शकतो.

ट्रक ड्रायव्हरच्या तपासात नागरोटा येथील हे स्थान त्याने ओळखले. तेथे आरडीएक्‍ससह पेरलेले बॉम्ब सापडले. त्यामुळे पुलवामासारख्या हल्ल्याची योजना असावी असे मानण्यात येत आहे. नागरोटा हे लष्कराच्या 16 व्या कंपनीचे मुख्यालय आहे. जम्मू भागातील संपूर्ण सीमेवर लक्ष्य ठेवण्याचे काम तेथून चालते. या दहशतवाद्यांकडून अर्मोर्ड पिअरसिंग स्टील जप्त करण्यात आले. ते बुलेटप्रुफ वाहनांसाठी वापरण्यात येते. ड्रायव्हर आणि क्‍लिनरच्या चौकशीत त्यांच्या फोनवरून या अतिरेक्‍यांनी काश्‍मिरातील काही जणांशी सपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.

मेलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या सॅटेलाईट फोन आणि जीपीएसची तपासणी करण्यात येत आहे. या ट्रकमध्ये युरीयाची पोथी भरताना या ट्रक ड्रायब्हरने ुःशारीने काही वस्तू त्या स्थानाजवळ सोडल्या होत्या. हा ट्रक ड्रायव्हर एका दहशतवाद्याचा चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.