#AusOpen : झ्वेरेव्हवर मात करत डाॅमिनिक थीमची अंतिम फेरीत धडक

मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी २६ वर्षीय पाचव्या मानांकित डाॅमिनिक थीमने जर्मनीच्या अॅलेक्झँडर झ्वेरेव्हचे आव्हान ३-६, ६-४, ७-६(७-३), ७-६(७-४) असे परतवून लावत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. ही लढत ३ तास ४२ मिनिटे चालली.

आता रविवारी रंगणा-या अंतिम सामन्यात डाॅमनिक थीमसमोर गतविजेता आणि आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान असणार आहे. सर्बियन जोकोविच गेल्या १२ लढतीपासून अपराजीत आहे.

दुस-या मानांकित जोकोविचने राॅजर फेडररला नमवून गुरूवारीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, ६-४, ६-३ असे नमवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.