Ghaziabad । देशाची राजधानी दिल्ली जवळील गाजियाबाद परिसरातील एका LED Bulb फॅक्टरीत पोलिसानी छापा मारला. या एलईडी बल्ब कारखान्यात हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि Antacid च्या बनावट औषधांचा साठा पोलिसांना सापडला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसातील गुन्हे शाखाने या कारख्यानातून तब्बल एक करोड १० लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात ब्रँडेड औषधांची कॉपी करून बनावट औषध बनवली जात होती. भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या औषधांची कॉपी येथे होती. पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे कि, या बनावट औषध मार्केटमध्ये पोहचली असून या बनावट औषधांची विक्री झाली असावी.
पोलिसांनी पुढे सांगितले,’या कारखान्यात बनावट औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात होती. येथून आम्ही बनावट औषध बनवण्याचा कच्चा माल ताब्यात घेतला आहे.
Ghaziabad । छापेमारीत मुख्य गुन्हेगार अटक
गाजियाबाद ड्रग्स विभागाने पोलिसानं सोबत ज्वाइंट ऑपरेशन करत या कारखान्यावर छापा मारला, त्यावेळी विजय चव्हाण याला अटक करण्यात आली.
Ghaziabad । खऱ्या ओषधांप्रमाणे करायचे पॅकेजींग
या छापेमारीत समोर आलेल्या माहितीनुसार बनावट औषधांची पॅकेजींग ही खऱ्या ओषधांच्या पॅकेजींगप्रमाणे होत असे. त्यामुळे ग्राहकांना खऱ्या आणि खोट्या ओषधांमधील फरक कळत नसे
हेही वाचा
राज्यातील 19 जागांवर लढण्याची काँग्रेसची तयारी; ‘या’ मतदारसंघातील उमेदवारांचा घेतला आढावा