बॉलीवूड क्वीन कंगना राणावत ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या विधानामुळे चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत असते. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेक वादांमुळे कंगनाला ट्रोलही व्हावे लागले आहे. अशात आता तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिलांबद्दल बोलताना दिसत आहे. कंगनाने महिलांची तुलना वॉशिंग मशीनशी केली आहे.
कंगनाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना महिलांबद्दल बोलताना दिसत आहे. ती माईकवर ‘महिला वॉशिंग मशीन आहे का, जी वापरली जाते’ असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर ती त्याच व्हिडिओमध्ये पुढे म्हणते, ‘सहमतीच्या नातेसंबंधात, नेहमी वापरल्या जाणार्या स्त्रीचा आणि त्याचा आनंद घेणारा पुरुष का असतो?’ कंगना तिच्या व्हिडीओमध्ये अशाच अनेक गोष्टी बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक यूजर्स कंगनाला सपोर्ट करत आहेत तर अनेक जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती पी. वासू दिग्दर्शित तिच्या ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटासाठी खूप चर्चेत आहे. या सिनेमात ती लीड लीडच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होत आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा 2005 मध्ये आलेल्या सुपरस्टार रजनीकांत स्टारर चित्रपट चंद्रमुखीचा सिक्वेल आहे.