मुंबई- सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी लंडनला रवाना झाली आहे. नुकताच तिने लंडनमधला व्हीडियो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. छू मंतर या चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे.
रिंकू मनसोक्त ती लंडनवारी करते आहे. लंडनमध्ये ती मनमुराद भटकंती करताना दिसते आहे. आपल्या भटकंतीचा व्हीडियो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कोरोनाच्या काळात सध्या लंडनमध्ये मराठी सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात रिंकू बरोबर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि सुव्रत जोशी हे सुद्धा झळकणार आहे.
सैराटमधल्या लंगड्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीबरोबर झळकणार
दरम्यान, या व्हीडियोवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्सचा पाऊस पाडलाय. तर एकाने चक्क वऱ्हाड निघालं लंडनला, असं लिहिलं आहे. कोरोना काळात संपुर्ण काळजी घेत सगळे शुट करत आहे.