मुंबई- दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेला आपल्या लाडका लंगड्या म्हणजेच तानाजी गळगुंडे हा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे.
कोरोनात आर्ची पोहचली थेट लंडनला, पहा व्हीडियो…
तानाजीसोबत अभिनेत्री मोनालिसा बागल यांची जोडी या चित्रपटात झळकणार आहे. तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित “भिरकीट” या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
View this post on Instagram
ड्राय डे, परफ्यूम, गणू, झाला बोभाटा, टोटल हुबलाक अशा चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून मोनालीसा बागल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तर तानाजीची भूमिका सैयाट या चित्रपटातून महाराष्ट्राने पाहिली. प्रचंड लोकप्रिय झाली होती.
दरम्यान, सैराट चित्रपटातील सगळ्यात पात्राला प्रेक्षकांंनी डोक्यावर घेतलं होतं. मराठी चित्रपटाला मोठ्या स्तरावर नेण्याचं काम नागराज मंजुळेंच्या या चित्रपटाने केलं आहे.