Rinku Rajguru Troll| मराठी कलाविश्वातील ‘फिल्मफेअर मराठी २०२४ पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरुने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर काहींनी तिच्या लुकवरून तिला ट्रोल केले आहे. अनेकांना रिंकुचा लुक पसंत पडला नाही. सध्या सोशल मीडियावर फिल्मफेअर अवॉर्डमधील तिचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
रिंकूने फिल्मफेअर अवॉर्डमध्ये पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी केला होता. मात्र डिप लेक गाऊनमुळे तिच्यावर टीका केली आहे. नेहमीच साध्या, निरागस सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या रिंकूचा हा हटके वेस्टर्न लूक पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु या लुकवरून मोठ्या प्रमाणावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. Rinku Rajguru Troll|
“लाज शरम सर्व घालवली आहे, एक सैराट काय हिट झाला तर हवेतच गेली”, “काय कपडे घातले अगं आर्चे, जरा जीवाला लाज”,” “जिथं कला संपते तिथे ‘प्रदर्शन’ सुरु होत…” असे म्हणत अनेकांनी रिकूंला ट्रोल केले आहे.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने कमी वयातच ‘सैराट’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. ‘सैराट’ सुपरहिट झाल्यानंतर तिने ‘झुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. यानंतर तिने झिम्मा 2, कागर या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. Rinku Rajguru Troll|
हेही वाचा:
दीपिका पदुकोण बनली ‘लेडी सिंघम’