मुंबई – खतरो के खिलाडीच्या 13 व्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या ‘अर्चना गौतम’विषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टंट करताना अर्चनाला गंभीर दुखापत झाली आहे. स्वतः अर्चना गौतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. अर्चना गाैतम ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अर्चना गाैतम हिने बिग बाॅसमध्ये धमाका केला होता.
अर्चना गाैतम हिच्या चेहऱ्याजवळ ही जखम झालीये. इतकेच नाही तर तिला टाके देखील पडल्याचे कळत आहे. अर्चना गाैतम हिची दुखापत गंभीर असल्याचे कळत आहे. यापूर्वी रोहित रॉय, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी आणि अंजुम फकीह यांना देखील स्टंट करताना दुखापत झाली होती.
अर्चना गौतम बिग बॉस 16 पासून खूप लोकप्रिय झाली आहे. या शोमुळे तिला रोहित शेट्टीचा स्टंट आधारित शो मिळाला. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. ती सध्या या मालिकेच्या चित्रिकरणासाठी आफ्रीकेतील केपटाऊन येथे गेली आहे.