श्रीनगर – उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांची ओळख पटेली नाही.
मंगळावारी ही चकमक झाली. माचिल सेक्टरच्या पाकिस्तान सीमेपलीकडे काही हालचाली होत असल्याची जाणीव तेथे तैनात असलेल्या सुरक्षा जवानांना झाली. त्यांनी तेथे मोर्चेबांधणी केली होती.
भारतीय हद्द ओलांडून काही दहशतवादी आत येण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना टिपण्यात आले. लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
ठार झालेले अतिरेकी पाकिस्तानी आहेत हे स्पष्ट असले तरी त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.