आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. सोनालीने आपले मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे. आपली मातृभाषा जपण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनालीने डान्सिंग करिअरमधील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही. डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज या डान्स रिऍलिटी शोमध्ये तिने हा निर्णय जाहीर केला. डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज या शोमध्ये सोनाली परीक्षक आहे. डान्सिंग क्वीनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात सोनालीने तिच्याच गाण्यांवर वेगळ्या स्टाइलमध्ये डान्स केला.
दरम्यान लवकरच या डान्स शोचा ग्रॅंड फिनाले प्रदर्शित होणार आहे. सोनाली तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती. नुकतीच ती लंडनहून परतली आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.