लोणीकंद (वार्ताहर)- नाशिक मधील भगूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीर संघाच्या मान्यतेने व रेसलिंग असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या वरिष्ठ ग्रीक रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्राचा मल्ल दिग्विजय भोंडवे याने 130 किलो वजन गटात सातार्याचे पै. सिद्धेश साळुंखे, पुण्याचे पै. आदित्य मोहोळ व अंतिम फेरीत कोल्हापूरचा मल्ल शुभम सिदनाळे वर 8-0 गुणांनी मात करत सुवर्णपदक पटकावले.
रेसलिंग असोसिएशन ऑफ नाशिक चे अध्यक्ष विशाल बलकवडे व पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता. या सर्व मल्लांमधून सर्वोत्कृष्ट खेळी करत सुवर्णपदकाची कमाई केल्याने पै. दिग्विजय भोंडवेचे कौतुक होत आहे.
लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असलेल्या पै. दिग्विजय यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, एनआयएस कोच महिपत कुंडू, संतोष यादव व सुरज तोमर हे मार्गदर्शन करत आहेत.
दिग्विजय च्या यशामुळे त्याचे जाणता राजा कुस्ती केंद्राचे अध्यक्ष पै. सचिन पलांडे व सभासद नाना जाधवराव पै. निळोबा कंद, पै. सोहम शिंदे, पै. किरण शिंदे, पै. सुनील कटके, सोमनाथ वाळके, संतोष काळे, संदीप कंद, सोमनाथ कंद यांनी अभिनंदन केले.