वीसगाव खोरे (वार्ताहर) – प्रत्येक शिक्षकातील कला गुण ओळखून त्यांना योग्य न्याय देणारे, कार्यालयीन कामकाजात सर्वांना समान न्याय देवून उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे आदर्श प्राचार्य म्हणून रमेश बुदगुडे यांची राज्यात ओळख आहे, असे गौरवोदगार माजी शिक्षक आमदार पुणे विभाग दत्तात्रय सामंत यांनी सेवापूर्ती सोहळ्यात काढले.
खानापूर (ता.भोर) येथे राजगड ज्ञानपीठ संचलित सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व ज्युनि. कॉलेजमध्ये भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश बुदगुडे यांचा सेवेची ३६ वर्षे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्य करून सेवापूर्ती गौरव सोहळा समारंभ संपन्न झाला.प्राचार्य रमेश बुदगुडे यांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर आधारित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित आधारवड या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले,कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे सभापती रोहिदास उंद्रेपाटील,वरिष्ठ प्रकल्प संचालक (सारथी पुणे) नामदेव शेंडकर, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे,योजना संचालनालयाचे उपशिक्षण अधिकारी रामदास वालझाडे, असि. कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स तानाजी थोपटे,
नायब तहसीलदार योगेश चंदनशिव, रामचंद्र थोपटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आनंदराव आंबवले, खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे, युवा नेते अनिल सावले,राजगड कारखाना संचालक उत्तम थोपटे, माजी पंचायत समिती सदस्य सुवर्णा मळेकर, पंढरीनाथ भिलारे, सरपंच अमर बुदगुडे,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.