मुंबई – बॉलीवूड नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना मुंबईच्या रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. आता रेमो त्याच्या घरी विश्रांती घेत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याने ख्रिसमस सेलिब्रेशन केले आहे. या वर्षीही रेमो कुटुंबाबरोबर आणि काही जवळच्या मित्रांबरोबर ख्रिसमस साजरा केला.
डिसूझा कुटुंबाच्या पार्टीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ अभिनेता आमिर अलीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रेमो आणि आमिर अली आणि सॅंटा टॉय बरोबर थिरकताना दिसत आहे. शिवाय ख्रिसमसची तयारी कशी करण्यात आली आहे याचा देखील एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.
रेमो डिसूझा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आणि मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, या वर्षीचा ख्रिसमस माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट ख्रिसमस आहे. माझे सर्व मित्र, कुटुंब आणि चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या पत्नी लीझलचे विशेष आभार मानले आहे.