जामखेड / अहमदनगर – रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र शासनाच्या भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग,आयुष मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली,वैद्यकीय शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन,मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन शंभर विद्यार्थी क्षमतेसह मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत चालु शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुल जामखेड-कर्जत रोड रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे बीएचएमएस,नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या चालु शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून संस्थेस आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्यामुळे जामखेड-कर्जत तालुक्यातील वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे.
‘रत्नदीप’ शैक्षणिक संकुलात होमिओपॅथिक,नर्सिंग,फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून याठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून रत्नदीप शैक्षणिक संकुलात नव्या अभ्यासक्रमाचा समावेशाने जामखेड-कर्जतच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असून त्या माध्यमातून जामखेड-कर्जतच्या विकासासाठी मदत होणार आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…!!
मा.श्री.योगेश चंद्रे
तहसीलदार जामखेड
रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचेमार्फत दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 4 मार्च 2023 या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेडचे प्राचार्य डॉ. सर्फराज खान यांनी दिली आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर ही संस्था नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य देणारी संस्था आहे.येथे राज्याच्या विविध जिल्ह्य़ातील दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. ‘रत्नदीप’ संस्थेचे कार्य जामखेड-कर्जतच्या विकासासाठी निश्चित दिशादर्शक आहे.’रत्नदीप’ संस्थेच्या नव्याने मंजुर रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजमुळे जामखेड-कर्जतच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असुन त्यामुळे जामखेड-कर्जतच्या विकासासाठी मदत होणार आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…!!
मा.श्री.प्रकाश पोळ
गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड