मंचर,(प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोटरीपदी वकिलांची नेमणूक झाल्याने त्याचा फायदा सामान्यांना होईल, वकिलांचे पक्षकार यांना करावे लागणारे प्रतिज्ञापत्र, कागदपत्रांच्या सत्यप्रती, विविध नोटरी करारनामे करण्यासाठी यामुळे मदत होईल. त्यामुळे लोकांचा वेळ पैसा वाचेल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील नव्याने नोटरी झालेल्या वकिलांचा सत्कार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय पूजन मंचर येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, अनेक दिवसांच्या कालावधीनंतर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोटरीपदी वकिलांची नेमणूक झाली आहे.
नोटरी वकिलांचा फायदा सर्वसामान्य नागरिक, वकिलांचे पक्षकार यांना करावे लागणारे प्रतिज्ञापत्र तसेच विविध कागदपत्रांच्या सत्यप्रती,विविध नोटरी करारनामे करण्यासाठी होईल. त्यामुळे लोकांचा वेळ पैसा वाचेल आणि सर्वसामान्य लोकांना आधार मिळेल, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, घोडेगाव न्यायालयातील पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
तसेच यापुढील काळात वकिलांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. नोटरीपदी नियुक्ती झालेले सदस्य अॅड.प्रमोद काळे, अॅड. श्रीकांत काळे,अॅड. विलास शेटे, अॅड. विनोद चासकर, अॅड. चेतन उदावंत, अॅड. सुदाम मोरडे , अॅड. दीपक लोहोटे, अॅड. वैशाली बांगर, अॅड. अनिता पोखरकर, अॅड. राजश्री करंडे, अॅड. ज्योती खेसे, अॅड. ज्ञानेश्वर श्रीरसागर, अॅड. दीपक लायगुडे इत्यादी नोटरी वकिलांचा सत्कार वळसे पाटील यांचे हस्ते करण्यात आला. लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. निलेश शेळके यांनी प्रास्ताविक केले. अॅड. हनुमंत पर्वत यांनी आभार मानले.