लाखणगावचा चेहरामोहरा बदलणाऱ्या लोकनियुक्‍त सरपंच ‘प्राजक्‍ताताई रोडे-पाटील’

संसाराचा गाडा चालवत असताना आणि कुटुंबाची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पडत असताना समाजातील गोरगरिबांची कामे करून त्यातच आपला आनंद मानायचा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे, असे मानून गावचा चेहरामोहरा बदलाचे काम करून करोना काळात ग्रामस्थांची आरोग्य काळजी आणि सुविधा उपलब्ध करून देऊन करोना योद्धा म्हणून कामगिरी पार पडत आहे. लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला आदर्श सरपंच सौ. प्राजक्‍ताताई शिरीषकुमार रोडे-पाटील.

लाखणगाव हे तालुक्‍यातील छोटे गाव या गावातील प्राजक्‍ताताई रोडे यांचा विवाह बांधकाम व्यावसायिक शिरीषकुमार रोडे-पाटील यांच्याशी झाला. घरात सामाजिक कार्याची आणि राजकीय पार्श्‍वभूमी आणि कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर निष्ठा असलेले रोडे पाटील घराणे म्हणून ओळखले जाते. घरातील कुटुंबाची जबाबदारी तसेच शेतीचे करत असताना गावातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याबरोबर महिलांचे प्रश्‍न सोडवणे आणि निराधार महिलांना मदत करणे ही कामे करण्यात आली.
गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्राजक्‍ताताई रोडे-पाटील यांनी विरोधी पक्षाची 15 वर्षीची असलेली सत्ता उखडून थेट जनतेतून सरपंचपदी विक्रमी मतांनी निवडून आल्या आणि गावचा कारभार हाती घेतला.

राज्याचे उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासकामांचा धडका लावला.
गावातील वाड्या-वस्त्यांवरील रस्ते गावातील अंतर्गत गटारे, स्मशानभूमी सुशोभिकरण, वस्त्यांवरील अंगणवाड्या, शाळा आदी विकासाची तीन कोटी रुपयांची कामे करण्यात आली. तसेच धार्मिक कामे करण्यात आली गावातील लोकवर्गणीतून सुमारे दीड कोटी रुपयांचे मंदिराचे काम सुरू आहे. गावातील पाच भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले.

करोना काळात ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. घरोघरी आरोग्य तपासणी आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण गाव बंद असताना गोरगरिबांची काळजी घेण्यात आली. त्यांना मोफत धान्य, किराणा माल, भाजीपाला, घरपोच देण्यात आला. तसेच दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळी भेट म्हणून गरीब महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले.

गाव कृषी पर्यटन करण्याचा ध्यास
गावाला 108 एकर गायरान जमीन असून यामध्ये 12 एकर फळबाग लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. आंबा, सीताफळ, चिंच आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. झाडांची वाढ चांगली झाली असून यामध्ये अंतर्गत भाजीपाला, कडधान्य तसेच शेवग्याची लागवड करून शेवग्याची बाग फुलवण्यात आली आहे. यामधील पिकलेल्या भाजीपाला गावातील गरीब लोकांना मोफत देण्यात येत आहे. 

भविष्यात पाच हजार आंबा झाडांची लागवड करण्यात येणार आहे. समृद्ध गाव योजनेमध्ये गावाची निवड झाली आहे. ही सर्व कामे करताना ग्रामस्थांचे आणि सर्व ग्रांमपंचायत सदस्य याचे सहकार्य, मार्गदर्शन आणि मोलाची साथ मिळत आहे. भविष्यात हे गाव कृषी पर्यटन करण्यात येणार आहे असे सरपंच प्राजक्‍ता रोडे-पाटील यांनी सांगितले.

भविष्यातील विकासकामे
भविष्यात अनेक विकासाची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण, वाड्या वस्त्यांवरील जीवनमिशन अंतर्गत 50 लाखांची पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे. गावात विकासाची कामे करून गावाचा कायापालट करण्याचे काम सरपंच प्राजक्‍ताताई रोडे पाटील या करीत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.