Apple iPhone Alert : तंत्रज्ञान कंपनी Apple ने आज देशातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांना अलर्टचा मेसेज पाठवला आहे. “कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत.
अॅपलकडून पाठवण्यात आलेल्या अलर्ट मेसेज मध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे. या नेत्यांनी ट्विटरवर यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर क्वेश्चन’ प्रकरणात आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच महुआ मोईत्रांनी मंगळवारी सकाळी अॅपलकडून आलेला इशारा देणारा संदेश पोस्ट केला.
So far list of INDIAns that @HMOIndia have tried to hack have been myself, @yadavakhilesh,@raghav_chadha @ShashiTharoor @priyankac19 @SitaramYechury @Pawankhera & others in office of @RahulGandhi .
This is worse than Emergency. India is being run by low life Peeping Toms.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 31, 2023
महुआ मोईत्रा या आयफोन वापरत असून सरकार पुरस्कृत हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा इशारा होता. असाच संदेश काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, सीपीआय-एम नेते सीताराम येचुरी, आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा समावेश आहे. याशिवाय AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनाही अलर्ट पाठवण्यात आला आहे. यांनाही आले आहेत.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विटरवर लिहिले, ‘प्रिय मोदी सरकार, तुम्ही असे का करत आहात?’ टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, त्यांना अॅपलकडून नुकताच इशारा मिळाला आहे की, सरकार त्यांचा आयफोन आणि मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी सांगितले की, अॅपलच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनाही इशारा देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या गोपनीयतेवर झालेला हा हल्ला बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, अॅपल थ्रेट नोटिफिकेशनद्वारे मला कळले की माझ्या फोनला लक्ष्य केले जात आहे.
दुसरीकडे शशी थरूर यांनी खोचक पोस्ट केली आहे. “हे संदेश अॅपलकडून आले आहेत. याची खात्री मी केली आहे. ते खरे आहेत. माझ्यासारख्या करदात्यांचा पैसा बिनकामी बसून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यावर अशा प्रकारे खर्च होत असल्याचं पाहून आनंद होतोय. याशिवाय दुसरं काही महत्त्वाचं काम राहिलेलं नाही का?” असा खोचक सवाल शशी थरूर यांनी पोस्टमधून विचारला आहे.