अंतानानारिवो – अफ्रीका खंडातील मेडागास्कर या छोट्या देशात जर्मनीच्या संशोधकांना तब्बल 107 वर्षांनी दुर्मिळ सरड्याचे दर्शन झाले आहे. “फार्सीफार वोल्टकोवी’ असे या सरड्याचे नाव आहे. १९१३ नंतर हा सरडा दिसला नव्हता पण आता मेडागास्करच्या जंगलात हा सरडा आढळल्याने संशोधक आनंदले आहेत. मेडागास्करमधील जंगल हेच या अनोख्या सरड्याचे नैसर्गिक निवासस्थान आहे.
सरड्याची फार्सीफार वोल्टकोवी नावाची हि प्रजाती पावसाळी हंगामात पिलांना जन्म देते हि पिले अतिशय वेगाने मोठी होतात. रंग बदलण्याचे गुण या सरड्यामध्येही असून मादी सरड्याच्या शरीरावर गर्भावस्थेत अतिशय अनोखे आणि आकर्षक रंग खुलून येतात.