मेष : वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामात स्वत: जातीने लक्ष द्याल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. पैशाची आवक समाधानकारक राहील. विनाकारण होणारा विलंब व गैरसोय तुमची चिडचिड वाढवेल. नोकरीत आळस केलात तर त्याचा त्रास नंतर होईल. मिळालेल्या पैशांचा वापर योग्य कारणासाठीच होतो ना? याकडे लक्ष द्या. घरात मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना मानसिक स्वास्थ्य मिळेल.
वृषभ : माणसांची पारख करण्यात यश आले तर बरेच काही मिळवू शकाल. सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने कोड्यात पडाल. व्यवसायात कामांना कुठून व कशी सुरुवात करावी असा संभ्रम राहील. त्यामुळे थोडा विलंब सहन करावा लागेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेतलेत तर त्रास होणार. नोकरीत कामात चोख राहा. पैशाच्या मोहापासून चार हात लांब राहा. सामंजस्याने प्रश्नांची उकल केलीत तर लाभ तुमचाच होईल. घरात व्यक्तींच्या जीवनातील शुभघटनेची नोंदी होईल.
मिथुन : ग्रहांची साथ मिळेल. गतिमान बनून महत्त्वाच्या कामात कृती केली तर त्याचा उपयोग सर्वांगाने तुम्हालाच होईल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यास आधुनिक तंत्र अमलात आणाल. नोकरीत महत्त्वाच्या कामात तुमचा सहभाग राहील. वरिष्ठ सहकाऱ्यांमध्ये तुमच्या कामामुळे स्वत:ची छाप पाडाल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद वाटेल. महिलांना मनाजोगते वागता येईल. केलेल्या कामाचे चीज होईल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कर्क : रवी, शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे कामाची विस्कटलेली घडी नीट व्हायला मदत होईल. व्यवसायात पैशाच्या व्यवहारांना महत्त्व दिले तर बरीचशी कामे मार्गी लागतील. नेहमीच्या कामापेक्षा वेगळ्या कामात लक्ष घालण्याचा आनंद मिळेल. अडकून पडलेले पैसे मिळतील. नोकरीत विरोधकांचा बिमोड करू शकाल. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. घरात लांबलेले शुभकार्य मूर्त स्वरूपात येईल. नवीन खरेदीचे बेत पार पडतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.
सिंह : अडथळ्यांची शर्यत पार करून कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या तडजोडीचा चांगला परिणाम दिसून येईल. पैशाची बाजू सुधारेल. तुमच्यातील चैतन्य जागृत होईल. नोकरीत कामानिमित्ताने एखादी सुविधा मिळेल. प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात काही मतभेद असतील तर ते संपुष्टात येतील. महिलांना नवीन दिशा मिळेल.
कन्या : योग्य वातावरण लाभेल. कामात आलेला विस्कळीतपणा पूर्वस्थितीवर आणू शकाल. व्यवसायात कामात व्याप वाढेल. कामात सुधारणा दिसू लागेल, तत्त्वाशी तडजोड व हितचिंतकांची मदत यामुळे कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन कामाची पद्धत व वातावरणातील बदल यामुळे अस्वस्थता येईल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्या. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
तुळ :ठरवलेली कामे पूर्ण करण्याचा चंग बांधाल. वेळ व पैशाचे गणित आखून त्याप्रमाणे कृती कराल. व्यवसायात प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करा. मिळालेल्या संधीचा योग्य तो फायदा घ्या. योग्य वेळी कामात योग्य व्यक्तीची मदत घेऊन पूर्ण करा. विलंब झालेली कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत बढाया न मारता कामांवर लक्ष द्या व वेळेत पूर्ण करा. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. घरात चांगल्या कारणासाठी मोठे खर्च होतील.
वृश्चिक : केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यामुळे समाधानाचा आनंद मिळेल. तुमच्या प्रगतीच्या रथाला गती येईल व परिस्थिती झपाट्याने बदलेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. लांबलेली कामे मार्गी लागतील. कामात विस्तार करण्याचा विचार येईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या कामाविषयी वरिष्ठांना खात्री वाटेल. नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. प्रतिष्ठा वाढेल. घरात छानसा कार्यक्रम ठरवाल.
धनु : ताणतणाव कमी झाल्याने निःश्वास टाकू शकाल. अनेपक्षित सुखद दिलासा मिळेल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींकडून कडू गोड अनुभव येतील. त्यामुळे बरेच काही शिकाल. कामात चोख राहून कामे वेळेत पूर्ण करा. नवीन कामे मिळतील. नोकरीत चांगल्या कामासाठी तुमची निवड होईल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. मात्र अतिआत्मविश्वास बाळगू नका. कौटुंबिक प्रश्न कमी होतील. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. धार्मिक कामात पुढाकार राहील.
मकर : मंगळ अनुकूल असल्याने मनोबल उत्तम राहील. आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रगती कराल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन पूर्ण कराल. खर्च व जमा यांचे प्रमाण समसमान राहील. तुमचा आत्मविश्वास बळावेल त्या जोरावर अशक्यप्राय कामे हाती घेऊन पूर्ण कराल. नोकरीत कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सहकारी व वरिष्ठ कामासाठी तुमची खुशामत करतील. मात्र अतिभावनेच्या आहारी जाऊ नका. खुबीने वागून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ : सभोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही जुळवून घेण्यात यशस्वी झाला तर तुमचा कार्यभाग साधेल. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक ठरेल. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीत महत्त्वाची कामे स्वत: हाताळाल. कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. कामाचा थोडासा ताण कमी होईल. घरात तरुणांना नवीन व्यक्तीविषयी आकर्षण वाटेल. वादविवाद मिटतील.
मीन : योग्य दिशा मिळाल्याने कामात गती येईल. व्यवसायात योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. आशेचा किरण दिसेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवलेत तर पैशाची चणचण भासणार नाही. नोकरीत आपले काम बरे नी आपण बरे, हे धोरण ठेवा. सहकाऱ्यांची मदत मिळेल ही अपेक्षा नको. घरात मतभेदाचे प्रसंग आले तरी डोके शांत ठेवावे. महत्त्वाचे निर्णय तूर्तास लांबणीवर टाकावेत. अनावश्यक खर्च टाळावेत. अतिआत्मविश्वास बाळगू नये.