Arvind Kejriwal in court। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात ईडीकडून त्यांना वेळोवेळी समन्स बजवण्यात आले होते. मात्र त्यांनी हजेरी लावली नव्हती. आज कोर्टात पुढच्या हजेरीत मी स्वतः प्रत्यक्ष कोर्टात हजेरी लावेन असे त्यांनी सांगितले.
ईडीने बजावलेल्या समन्सला उत्तर न देता कोर्टात केजरीवाल हजर झाले नव्हते. या प्रकरणाची दखल घेऊन ईडीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने केजरीवाल यांना 17 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यास सांगितले.
ईडीकडून हा युक्तिवाद न्यायालयात सादर Arvind Kejriwal in court।
समन्स, कागदपत्रे तयार करणे इत्यादी संदर्भात ईडीचे अधिकार देणाऱ्या मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 50 चे पालन न केल्यामुळे ईडीने तक्रार दाखल केली होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर हजर होऊन ईडीच्या वतीने युक्तिवाद केला.
१६ मार्चला होणार कोर्टात हजर Arvind Kejriwal in court।
केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, विश्वास प्रस्तावही सभागृहात मांडावा लागेल, त्यासाठी त्यांना बैठकीला हजर राहावे लागणार आहे. सीएम केजरीवाल यांनी आपल्या वकिलामार्फत सांगितले की, मला आज यायचे होते, पण अचानक विश्वासदर्शक ठराव गेला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात होणार आहे. आता केजरीवाल यांना 16 मार्चला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे.