मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली.
सध्या बिग बी मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत.
दरम्यान, नुकतंच अमिताभ यांनी आपले वडील ‘हरिवंश राय बच्चन’ यांची एक कविता शेअर केली आहे. याबद्दल त्यांनी म्हटलं कि, ‘बाबूजींनी जी माणसं न थकता काम करत असतात, जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर ही कविता लिहिली आहे. या कवितेसोबत बच्चन यांनी एक फोटो ही शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले आहेत. ते आपल्या आरोग्याबाबत माहिती देण्यासह फॅन्सनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद व्यक्त करीत आहेत.