करोना विषाणूच्या साथीमुळे सर्व देश 21 दिवस लॉकडाऊन केला गेला आहे. या स्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीजचे वेगवेगळे टॅलेंट समोर यायला लागले आहे. रोज कोणी ना कोणी घरबसलेल्या केलेल्या उद्योगाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करून हे सेलिब्रिटीज आपले कला कौशल्य पब्लिकपुढे सादर करत आहेत. अनुष्का शर्मानेही असाच एक व्हिडीओ बनवला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व कटिंग सलून आणि पार्लरही बंद आहेत. विराट कोहलीचे वाढलेले केस कापण्याचा व्हिडीओ अनुष्काने केला आहे.
गरज म्हणून आपल्याला कटिंगचेही काम करण्याचे स्कील डेव्हलप करायला लागल्याचे तिने म्हटले आहे. याच व्हिडीओमध्ये कटिंगच्या पूर्वीचा आणि नंतरचा विराटचा लुक देखील फॅन्सना दाखवला गेला आहे. या व्हिडीओला फॅन्सकडून भन्नाट प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. काहींनी भन्नाट कॉमेंटपण केल्या आहेत. विराटने देखील आपली पत्नी अनुष्काला अशाच प्रकारे मदत करायला पाहिजे, अशी मागणीवजा अपेक्षाही काही जणांनी व्यक्त केली आहे. विराट आणि अनुष्का यांनी या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये घरातच बसून राहिल्याने असे खूप व्हिडीओ बनवले आहेत आणि सोशल मिडीयावर अपलोडदेखील केले आहेत.