नवी दिल्ली – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्या एका ट्विटमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. याप्रकरणी कारवाई करत भारतीय जनता पक्षाच्या लीगल सेलने आता 41 जिल्ह्यांमध्ये एफआयआर दाखल केला आहे. भाजपच्या लीगल सेलने केवळ प्रियंकाच नाही तर काँग्रेसच्या एमपी युनिटचे प्रमुख कमलनाथ यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर दावा केला होता की, मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली आहे की त्यांना 50 टक्के कमिशन दिल्यावरच वेतन मिळते. एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी मध्य प्रदेशातील भाजपावर ५० टक्के कमिशनचा आरोप केला आहे. असाच आरोप कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर केला होता.
मध्य प्रदेश में ठेकेदारों के संघ ने हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश को पत्र लिखकर शिकायत की है कि प्रदेश में 50% कमीशन देने पर ही भुगतान मिलता है।
कर्नाटक में भ्रष्ट BJP सरकार 40% कमीशन की वसूली करती थी। मध्य प्रदेश में BJP भ्रष्टाचार का अपना ही रिकॉर्ड तोड़कर आगे निकल गई है।… pic.twitter.com/LVemnZQ9b6
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 11, 2023
त्यांनी आरोप केला होता की, कर्नाटकचे भ्रष्ट भाजप सरकार 40 टक्के कमिशन घेते. मध्य प्रदेशातील भाजप सरकार भ्रष्टाचाराचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडत पुढे गेले आहे. कर्नाटकातील जनतेने 40 टक्के कमिशन देऊन सरकारला मतदान केले, आता मध्य प्रदेशातील जनता 50 टक्के कमिशन देऊन सरकार हटवणार आहे.
भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेरसह 41 जिल्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेरसह 41 जिल्ह्यांमध्ये प्रियंका आणि कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इंदूरमध्ये, एडीसीपी मिश्रा म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांनी निवेदन दिले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की काही काँग्रेस नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती टाकत आहेत आणि यामुळे त्यांच्या (भाजप) नेत्यांची प्रतिमा मलिन होत आहे. … चौकशी सुरू आहे आणि वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई केली जाईल. प्रियांका गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांची नावे निवेदनात नमूद करण्यात आली आहेत.