Narendra Modi | Priyanka Gandhi । Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने ३५ हजार कोटींच्या खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांना भाजप मध्ये प्रवेश दिल्याने कॉंग्रेस नेत्या प्रियंकागांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
या संबंधात एक्सवर (ट्विट) त्यांनी म्हटले आहे की, “३५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी भाजपमध्ये सामील झाला. त्याच्यावर ९ सीबीआय प्रकरणांसह २० वेगवेगळे खटले आहेत. जंगले आणि खाणी नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
35 हजार करोड़ के घोटाले के आरोपी जनार्दन रेड्डी भाजपा में शामिल हो गए। उनके विरुद्ध CBI के 9 मुकदमों समेत अलग-अलग 20 मामले चल रहे हैं। जंगलों और खदानों को बर्बाद करने के आरोप हैं। जमानत के बदले जज को 40 करोड़ में खरीदने की कोशिश के आरोप हैं। भाजपा दिल खोलकर उनका स्वागत कर रही…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 30, 2024
जामीन मिळवण्यासाठी न्यायाधिशांना ४० कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. अशा व्यक्तीचे भाजप खुलेआम पक्षात स्वागत करते आहे. । Narendra Modi | Priyanka Gandhi । Lok Sabha Election 2024
मोदी-भाजप नावाच्या वॉशिंग मशिनमध्ये देशभरातील भ्रष्ट लोकांना निवडकपणे धुऊन घेतले जात आहे. ज्यांच्यावर विमान लिजिंग घोटाळ्याचा आरोप होता ते प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्यावरील हे प्रकरण सीबीआयने बंद केले.
हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणारे पंतप्रधान आता त्याच व्यक्तीला सोबत घेऊन त्यांचे सर्व ‘डाग’ धुवून काढत आहेत,अशी टीकाही प्रियंकांनी केली आहे.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करताना त्या म्हणाल्या की, एकीकडे कुख्यात भ्रष्ट लोकांना संरक्षण देणे, विरोधी पक्षनेत्यांना एजन्सींद्वारे धमकावणे, त्यांना आपल्या पंखाखाली घेऊन खटले बंद करून टाकणे
आणि दुसरीकडे खोट्या खटल्यात अडकवून विरोधकांना कमकुवत करणे. त्यांना खोट्या केसेसमध्ये टाकणे, त्यांची बँक खाती सील करणे एवढेच आता सरकारचे काम राहिले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. । Narendra Modi | Priyanka Gandhi । Lok Sabha Election 2024