लखनौ – पंतग उडविण्याच्या मांजामुळे महाराष्ट्रात अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याच मांज्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशीच घटना आता लखनौमध्ये घडल्याचं समोर आलं आहे.
लखनौमधील बहराइचमध्ये मोहम्मदा ओव्हर ब्रिजवर मोटरसायकलवरून जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला. त्यामुळे त्याची अर्धी मान कापली गेली. त्यानंतर तरुण वेगवान मोटरसायकलवरून खाली पडला. या अपघातात दीपक यादव (वय 24) याचा मृत्यू झाला.
विजय बहादुर यादव यांचा मुलगा असून तो भगतापूर येथे राहत होता. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चौकी प्रभारी एसआय इंद्रजीत यादव हे हमराही दिवाकर यांच्यासमवेत पोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मृत युवक दीपक यादव मोटर सायकलवरून बहराइचला जात होता. पतंगाचा चिनी मांजा गळ्यात अडकल्याने मोहम्मदा नाल्यावरील ओव्हर ब्रिजजवळ पोहोचताच अर्धी मान कापली. यामुळे तो तरुण खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.