पुणे- पुणे ते लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या संख्येत 1 ऑक्टोबरपासून संख्येत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही अतिरिक्त लोकल दुपारच्या सत्रात धावणार आहे.
सध्या पुणे -लोणावळा- पुणे मार्गावर पाच लोकल धावत असून, शुक्रवारपासून आणखी एक लोकल वाढविण्यात येणार आहेत. पूर्वी या मार्गावर लोकलच्या सुमारे 40 हून अधिक लोकलच्या फेऱ्या धावत होत्या. मात्र लॉकडाऊनदरम्यान ही सेवा स्थगित केली होती. तर ऑक्टोबरपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे.
ही लोकल पुणे येथून दुपारी 3 वाजता रवाना होणार असून, 4.20 वाजता लोणावळा येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात लोणावळा येथून सायंकाळी 5.30 वाजता सुटणार असून, पुणे येथे 6.50 वाजता पोहोचणार आहे.