आणखी एक पौराणिक मालिका लवकरच

काही महिन्यांपूर्वी “जय मल्हार’ ही खंडोबावर आधारित मालिका प्रचंड गाजली होती. सध्या टीव्हीवर गणपती, लक्ष्मी आणि विष्णूवर आधारीत वेगवेगळ्या मालिका सुरू आहेतच. आता त्यामध्ये आणखी एका पौराणिक मालिकेची भर पडणार आहे. त्या मालिकेचे नाव “नमः’ असे असून त्यात विष्णू आणि शंकराच्या मैत्रीची कथ दाखवली जणार अहे. यामध्ये व्हीएफएक्‍स आणि आफ्टर इफेक्‍टसचा भरपूर वापर केला जाणार आहे. या सिरियलमधील प्रत्येक एपिसोडवर निर्मात्यांकडून 30 लाख रुपये खर्च केले जाणार आहे, असे समजते आहे. यातील इफेक्‍टस अधिकाधिक परिणामकारक व्हावेत, यासाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा 20 व्हीएफएक्‍स एजन्सीची मदत घेण्यात आली आहे. पूर्णपणे काल्पनिक कथेवर आधारित या सिरियलमध्ये अनेक पात्रे, त्यांच्याशी संबंधित उपकथानक, युद्धाचे प्रसंग, चमत्कार आणि अतिविशाल सेट बघायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.