पिंपरीत आणखी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार

महिनाभरात पाच बालिकांवर अत्याचार

पिंपरी – एका 35 वर्षीय ओळखीच्या व्यक्तीने बालिकेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी येथे घडली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेमंत कृष्णा तांडेल (वय 35, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने गुरूवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 00 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आरोपी तांडेल याने फिर्यादीच्या घरात जाऊन फिर्यादीच्या चार वर्षे 11 महिन्यांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत.

गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये भोसरी येथे तीन, पिंपळे सौदागर आणि पिंपरी येथे प्रत्येकी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.