पाकिस्तानने दहशतवाद थांबवला तरच होणार चर्चा

भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका ठाम

संयुक्त राष्ट्रे : कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तान सैरळैर झाले आहे. त्यामुळेच काश्‍मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकने घेवून गेला. परंतु, तिथेही पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले आहे. कारण काश्‍मीरच्या मुद्यावरून संयुक्‍त राष्ट्रातील चीन सोडून कोणत्याही देशाने पाकचे समर्थन केले नाही. त्यातच आता भारतानेदेखील काश्‍मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दहशतवाद थांबवला तरच चर्चा शक्‍य आहे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंदद्वार बैठकीच्या पाश्वभूमीवर भारताने दहशतवादाच्या मुद्दयावर पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले आहे. काश्‍मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्याच्या मुद्दयावरून चीनच्या मागणीनुसार शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बंद खोलीत बैठक झाली. त्यानंतर चीनचे दूत शिंग जुन यांनी, उभय देशांनी आपापसातील प्रश्न शांततेच्या आणि संवादाच्या मार्गाने सोडवावेत आणि तणाव वाढू देऊ नये, असे आवाहन केले होते. त्या पाश्वभूमीवर भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सईद अकबरुद्दिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्‍मीरमधील स्थिती सुरळीत आणि शांत व्हावी हीच आमची इच्छा आहे. काश्‍मीरप्रश्नी झालेल्या सर्व करारांवर आम्ही ठाम आहोत. मात्र काही देश जिहादचा वापर करीत भारतात रक्तपाताला वाव देत आहेत. हिंसाचार हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर होऊ शकत नाही. दहशतवाद थांबवा, मगच आम्ही चर्चेला तयार आहोत असेही ठामपणे पाकिस्तानला सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×