भावाच्या पुण्यस्मरणानिमित्त पूरग्रस्तांसाठी घर बांधणार

सातव कुटुंबीयांचा वाघोलीत निर्धार

वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील संदीप शिवाजीराव सातव यांचे आकस्मित निधन झाले. संदीप सातव यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज अखेरपर्यंत आपल्या कुटुंबातील अनेक जणांचे वाढदिवस साधेपणाने साजरे करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. सातव यांच्या निधनानंतर पुणे जिल्हा भाजप कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप सातव पाटील यांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी भेट देऊन एका कुटुंबाचे घर बांधून देण्याचा निर्धार केला आहे.

प्रदीप सातव म्हणाले की, गेलेल्या व्यक्‍तीच्या निधनाने कुटुंबाचे किती नुकसान होते, याचा अनुभव प्रत्येकाला असतो. पण त्याच कुटुंबातील ज्या व्यक्‍तीकडून नवी प्रेरणा मिळाली. सामाजिक बांधिलकीची सवय लागली. त्याच्या निमित्ताने समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सातव कुटुंबीयांच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील एका कुटुंबाचे उद्‌ध्वस्त झालेले घर बांधकामासह पुन्हा उभे करून देण्याचा आणि आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्‍तीच्या सामाजिक जाणिवेचा वसा पुढे कायम ठेवण्याचा मानस असल्याचे सातव यांनी सांगितले.

लवकरच याबाबत पूरग्रस्त भागात सातव कुटुंबीय भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने पूरग्रस्त भागातील एका कुटुंबाचे पडझड झालेले घर उभे करून देणार आहे. या उपक्रमाचे शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप, सहपालकमंत्री संजय भेगडे, वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जयप्रकाश सातव आदींनी अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.