नवी दिल्ली : पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या केप्लर 160 या सुर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच एका ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे. तेथे मानवी वस्ती शक्य आहे का? याचा शोध घेतला जात आहे. ‘प्लॅनेट केओआय-456.04’ असे या ग्रहाचे नामकरण करण्यात आले असून, विशेष म्हणजे हा ग्रह त्याच्या सुर्यमालेत पृथ्वी इतक्याच अंतरावर वसलेला आहे.
एस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिझिक्स या नियकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात या ग्रहाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. स्वीत्झर्लंड येथील कंपनीने बनविलेल्या एस्प्रेसो उपकरणाद्वारे घेण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर या ग्रहाचे पृथ्वीशी साम्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्लॅनेट केओआय-456.04 या ग्रहाचे आकारमान पृथ्वीइतके आहे, तर ग्रहाची कक्षा त्याच्या सुर्यापासून ( केप्लर 160) 378 दिवस इतकी आहे, जी पृथ्वीच्या बरोबरीची आहे. तसेच या ग्रहावर सुर्यापासून मिळणारा प्रकाश 93 टक्के इतका आहे.
पृथ्वी ग्रहावर पडणारा सुर्यप्रकाशाचे प्रमाण देखील 93 टक्के इतके आहे. तसेच नासाने यापूर्वी या ग्रहाच्या भूपृष्ठाबाबत बरीच माहिती गोळा केली असल्याचा दावाही या लेखात केला आहे. मात्र अद्याप याबाबत नासाकडून फारशी माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही. तसेच आगामी काळात या ग्रहावरील वातावरण आणि भूपृष्ठाबाबत्ची अधिक माहिती मिळविण्यासाठी 2026 मध्ये एक मोहिम आखण्यात आली असून, यामध्ये नासाची जेम्स वेब स्पेस टेलोस्कोप आणि युरोपीयन अंतराळ संस्था असलेली प्लाटो स्पेस टेलिस्कोप या दोन संस्थाचा सहभाग या मोहिमेत असणार आहे. या मोहिमेद्वारे या ग्रहांवर पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी वसविण्यासाठी पोषक वातावरण आहे की नाही याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
Nice information