664 जणांना डिस्चार्ज : 13 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – शहरामध्ये बुधवारी (दि. 7) नव्याने 661 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 570 रुग्ण हे शहरातील आहेत, तर 91 शहराबाहेरील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण 13 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 रुग्ण हे शहराबाहेरील आहेत.
करोनाने मृत झालेल्या रुग्णांमध्ये 4 ज्येष्ठांसह 8 रुग्ण आहेत. चिंचवड, चिखली, भोसरी, थेरगाव, दिघी या परिसरातील हे रुग्ण आहेत. शहर हद्दीबाहेरील मृत झालेल्या 5 रुग्णांमध्ये 2 ज्येष्ठांचा समावेश आहे. उरळी देवाची, जुन्नर, मुंबई, चाकण, खेड येथील हे रुग्ण आहेत.
शहरातील 570 तर, शहराबाहेरील 91 रुग्ण आज करोनाबाधित आढळले. आत्तापर्यंत एकूण 81 हजार 942 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 76 हजार 50 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. शहर हद्दीबाहेरील 5 हजार 417 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 2 हजार 826 रुग्णांवर सध्या महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, 418 शहराबाहेरील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तसेच शहरातील 223 रुग्णांवर शहराबाहेर उपचार सुरु आहेत.
आत्तापर्यंत एकूण 53 हजार 510 नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले आहे. शहरात आत्तापर्यंत उपचार सुरू असताना एकूण 1 हजार 396 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत आतापर्यंत 22,36,922 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.