पुणे – शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे महापालिकेकडून सादर केलेल्या बधितांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या 24 तासांत नवीन 65 करोना बाधित सापडले आहेत. शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 943 वर गेली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 55 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेल्या आठवड्यात जवळपास दररोज शंभरी पार जाणारा नवीन करोना बाधितांचा आकडा आता काहीसा नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. पुणे महानागरपालिकेच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) 65 नवे बाधित आढळून आले. तर चार करोना बाधितांचा मृत्यू झाला. शहरातील बाधितांची संख्या आणि निर्बंध यामुळे नव्या बाधितांच्या संख्येने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वारजे माळवाडी परिसरातील 11 वर्षीय मुलाचा सोमवारी (दि. 4) रात्री मृत्यू झाला. तसेच दिवसभरात आणखी तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. येरवडा येथील 31 वर्षीय पुरुष भवानी पेठेतील 63 वर्षीय व्यक्ती पद्मावती परिसरात 66 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला.