मृत्यू थांबेनात! पुण्यात करोनोने आणखी 43 जणांचा मृत्यू

पुणे – शहरात आज नव्याने करोनाचे 1 हजार 691 बाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 563 बाधित करोनामुक्त झाले आहेत. सोमवारी एक दिवस बाधित संख्या एक हजारापर्यंत खाली आली होती. मात्र, आज ही संख्या पुन्हा सताराशेपर्यंत पोहचली. दरम्यान, गेल्या 24 तासांत 43 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

मंगळवारी (दि. 15) दिवसभरात 5 हजार 494 संशियतांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 42 हजार 946 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 1 लाख 22 हजार 448 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामधील 1 लाख 2 हजार 95 जण करोनामुक्त झाले आहेत.

 

गेल्या 24 तासांत जवळपास साडेतीनशे ते चारशेने सक्रीय बाधितांची संख्या वाढली असून, सध्या 17 हजार 478 बाधित सक्रिय आहेत. त्यातील 929 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

त्यातील 473 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे, तर 456 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.