एकूण रुग्णसंख्या ८३८
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी २० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८३८ वर पोहचली आहे.
रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, २० जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये जावळी तालुक्यातील गांजे येथील २४ वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील २० वर्षीय २ पुरुष व २४ वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील येथील गोवारे येथील ४० वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरुष व ११ वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील २८ वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील २१ वर्षीय महिला, बागलवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, फलटण येथील रविवार पेठ येथील ३ वर्षीय बालक, खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील ५० वर्षीय महिला, ४० व ५६ वर्षीय पुरुष व २ वर्षाचे बालक, म्हासुर्णे १८ वर्षीय तरुणी, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील ४९ वर्षीय २ महिला व १६ वर्षीय असे आहेत.