लंडन -ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ॲशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर ही मालिका होणार आहे.
या संघातून अष्टपैलु बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरेन यांना बाहेरच ठेवण्यात आले असून आर्चर व कुरेन दुखापतीने बेजार आहेत. तर स्टोक्सने क्रिकेटमधून अनिश्चित कालावधीसाठी विश्रांती घेतली आहे.
संघात निवड झालेल्या 17 खेळाडूंपैकी तब्बल 10 खेळाडू ऍशेस मालिकेद्वारे पदार्पण करण्यास सज्ज बनले आहेत.
इंग्लंड संघ – ज्यो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउली, हसीब हमीद, डॅनियल लॉरेंस, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिनसन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.