नवी दिल्ली – भारताची प्रख्यात महिला कुस्तीपटू सरिता मोर हिने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले. या कामगिरीसह तिने एक अनोखी कामगिरीही केली आहे.
जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी सरिता भारताची सहावी कुस्तीपटू ठरली आहे. तसेच जागतिक स्तरावर ब्रॉंझपदक जिंकणारी सातवी भारतीय खेळाडू ठरली आहे.
या स्पर्धेत सरिताने स्वीडनच्या सारा लिंडबोर्गचा 8-2 असा पराभव करत 59 किलो वजनी गटात ब्रॉंझपदक जिंकले. सरिताने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रजतपदकालाही गवसणी घातली होती.