नगरसेवकांविना पालिकेचा “प्रशासकीय’ वर्धापन दिन

आचारसंहितेचा अडसर : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये रंगल्या स्पर्धा

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन आज (शुक्रवारी) नगरसेवकांविना पार पडला. परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील स्पर्धांनी हा कार्यक्रम रंगतदार झाला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरूवात झाली. अतिरिक्‍तआयुक्‍तसंतोष पाटील, अजित पवार, मुख्य लेखापरीक्षक अमोद कुंभोजकर, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, अतिरिक्‍तआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सह शहर अभियंता मकरंद निकम, वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्‍त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, श्रीकांत सवणे, उपअभियंता माधव सोनावणे आदी उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर यांनी प्लॅस्टीक मुक्ती आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. क्रीडा विभागातर्फे संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माधव सोनावणे यांना पहिला, सुरेश साळुंखे यांना दुसरा तर तिसरा क्रमांक प्रशांत जोशी यांना मिळाला. तर महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत मनाली राणे यांना पहिला, उज्ज्वला गोडसे यांना दुसरा तर तिसरा क्रमांक सुप्रिया सुरगुडे यांना मिळाला. वैद्यकीय विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये 45 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्रदानासाठी अर्ज भरुन घेण्यात आले. त्यात 14 कर्मचाऱ्यांनी अर्ज जमा केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)