भारतीय ऍनिमेशन उद्योगाचे जनक राम मोहन यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय ऍनिमेशन उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे राम मोहन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

राम मोहन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1956 मध्ये भारत सरकारच्या फिल्म्स विभागातील कार्टून युनिटद्वारे केली होती. 1968 मध्ये त्यांनी फिल्म्स विभागातील नोकरी सोडूल प्रसाद प्रोडक्‍शनमध्ये ऍनिमेशन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत झाले होते.

त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी राम मोहन बायोग्राफिक्‍स नावाची स्वत: ची प्रोडक्‍शन कंपनी सुरू केली. 1992 साली जपानच्या युगो साको यांच्या सहकार्याने त्यांनी देशात रामायणाला ऍनिमेशनच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर आणले. त्यांचे हे कार्य लोकांच्या पसंतीस उतरले होते.

दरम्यान, राम मोहन यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी व्हिज्युअल ऍनिमेशन केले ज्यात पती, पत्नी और वो, शतरंज के खिलाडी , बीवी ओ बीवी, दो और दो पंच आणि कामचोर यांचा समावेश आहे. त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने ऍनिमेशन जगत पोरके झाले असल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.